निधन वार्ता : तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील माजी सैनिक श्रीकांत वट्टे यांचे निधन-
तुळजापूर : तालुक्यातील बारूळ येथील सेवानिवृत्त माजी सैनिक श्रीकांत दादाराव वट्टे वय (६८) यांचे अल्पशा आजाराने. दि, २७ रोजी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयामध्ये दुःखद निधन झाले . त्यांनी भारतीय सेने मध्ये आपल्या आयुष्यातील महत्त्वाची १५ वर्षे प्रामाणिकपणे यशस्वी सेवा करून निवृत्त झाले , नंतर गावातील प्रवासी वाहतूक सेवा व आधुनिक शेती यशस्वीपणे करून वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्यावर उद्या मूळ गावी बारूळ येथे रविवार दिनांक २८ रोजी सकाळी १०.३० वाजता बारूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे .
कै. श्रीकांत दादाराव वट्टे यांना सैनिक फेडरेशन संघटना धाराशिव जिल्हा व सर्व पदाधिकारी यांच्याकडून भावपुर्ण श्रध्दांजली🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🌹🌹🌹

0 Comments