दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात,-
सोलापूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम केल्यानंतर त्या कामाच्या मंजूर बिलाची रक्कम ग्रामपंचायत बँक खात्यांमधून (Bank Account) काढण्याची परवानगी देण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांन तक्रारदारास 2 हजाराची मागणी केली. तक्रारदारांनी ही मागणी पूर्ण न करता लाच लुचपत प्रतिबंध विभागाला कळवले आणि केवळ दोन हजारासाठी दक्षिण सोलापूर(South Solapur Taluka ) विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस हा एसीबी विभागाच्या जाळ्यात अडकला ही घटना गुरुवारी दिनांक 30 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की तक्रारदाराने 15 व्या वित्त आयोगाकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे सिमेंट काँक्रेट रोडचे काम केले होते; हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या कामाच्या एक लाख रुपये बिलाचे मूल्यांकन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रस्ताव पंचायत समिती(Panchyat Samiti) दक्षिण सोलापूर कडे सादर केला होता त्याचा पाठपुरावा करत असताना कामाच्या मंजूर बिलाची रक्कम ग्रामपंचायत (Grampanchyat) बँक खात्यांमधून काढण्याची परवानगी देण्याकरिता विस्तार अधिकारी संदीप खरबस यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली .लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर तालुका कार्यालयाजवळ सापळा रचुन(Trap) तक्रारदाराकडून लाच स्वीकारत असताना त्यास रंगेहात पकडले याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी लाच लुचपत प्रतिबंधक (Acb)विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले ,पोलीस निरीक्षक शैलेंद्र पवार ,पोलीस हवालदार अतुल घाडगे ,स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे ग्राम प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

0 Comments