येवती पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षा कडून रेणुका विजयकुमार गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा

Hot Posts

6/recent/ticker-posts

येवती पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षा कडून रेणुका विजयकुमार गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा

येवती पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षा कडून रेणुका विजयकुमार गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

काँग्रेस पक्षाने उमेदवारीची संधी दिली तर सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

निवडून येऊन वडील स्वर्गीय विजयकुमार गायकवाड यांची इच्छा पूर्ण करणार....... रेणुका गायकवाड

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आणि तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहापूर गटातील येवती पंचायत समिती गण हा पुन्हा सलग दुसऱ्यांदा एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या येवती पंचायत समिती गणातून मौजे इटकळ येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते स्वर्गीय विजयकुमार गायकवाड यांची कन्या रेणुका गायकवाड या काँग्रेस पक्षा कडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.स्वर्गीय विजयकुमार गायकवाड यांनी सामाजिक कार्यातून  गाव परिसरात तालुक्यात विशेष अशी ओळख निर्माण केली होती व सन २०१२ ला लक्ष्मी विजयकुमार गायकवाड या शहापूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती अगदी निसटता असा पराभव झाला.तेच वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेणुका गायकवाड यांनी येवती पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.स्वर्गीय विजयकुमार गायकवाड यांना शहापूर जिल्हा परिषद गटात मानणारा खूप मोठा गट असून त्याचा फायदा त्यांच्या कन्या रेणुका गायकवाड यांना होणार असल्याने येवती पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षा कडून रेणुका गायकवाड यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

रेणुका गायकवाड यांचीशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व सामान्यांना वाड्या वस्त्या पर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊन वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा असाच सातत्याने उंचावत ठेवणार असल्याचे ही सांगितले.येवती पंचायत समिती गणातून काँग्रेसने जर उमेदवारी दिली तर सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे ही रेणुका गायकवाड यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments