स्कूल बस चालकाची मुजोरी टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच धिंड काढत मस्ती उतरवली त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले

Hot Posts

6/recent/ticker-posts

स्कूल बस चालकाची मुजोरी टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच धिंड काढत मस्ती उतरवली त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले

स्कूल बस चालकाची मुजोरी टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच धिंड काढत मस्ती उतरवली त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले


पुणे/प्रतिनिधी रूपेश डोलारे : मगरपट्टा चौक पुलाखाली स्कूल बस क्रमांक MH-14 एम एम 9837 या बस चालकांनी किरकोळ कारणावरून शुक्रवारी दिनांक 9 रोजी तीनच्या सुमारास उड्डाणपुलाखाली टेम्पोचालकाला मारहाण शिवीगाळ करून मारहाण करत हॉकी स्टिकने टेम्पोची काच फोडली टेम्पो चालकाला भर रस्त्यात दमदाटी केली. जा कोणत्याही पोलीस चौकीला ,जा काय तक्रार करायची ते कर असे म्हणत पोलिसांना आव्हान देत रस्त्यावर दहशत निर्माण केली. दोन दिवस झाले तरी तक्रार दाखल करून घेतली नव्हती सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर व पत्रकार कार्यकर्ते यांनी या विषयावर आवाज उठवल्यानंतर हडपसर पोलिसांनी मस्तवाल स्कूलबस चालकाला शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

घटना घडली तिथे नेऊन गुडघ्यावर चालवायला लावून माफी मागायला लावली भविष्यात यापुढे अशी चूक करणार नाही अशी कबुली दिली .आरोपीची हडपसर पोलिसांनी काढलेली धींड घडवलेली अद्दल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने याची चर्चा हडपसर परिसरात चांगलीच रंगली आहे. सुरज रमेश पाटील वय (32) राहणार पिंपरी चिंचवड असे आरोपी स्कूल बस चालकाचे नाव आहे . याप्रकरणी टेम्पोचालक जयपाल सोनकांबळे राहणार हडपसर यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली.

 एका गरीब टेम्पो  चालक-मालक महाराष्ट्र संघटनेचे पुणे शहराध्यक्ष सोमनाथ आव्हाड जिल्हाध्यक्ष अफजल पठाण विशाल चव्हाण ,अतिश चौधरी ,महेश दराडे व पत्रकार यांनी पोलीस प्रशासनास कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. त्यास न्याय मिळवून दिला स्कूलबस चालक सुरज गणेश पाटील याला पोलिसांनी मगरपट्टा चौकात गुडघ्यावर चालवला लावून माफी मागायला लावली पुन्हा असे करणार नाही अशी नागरिकासमोर माफी मागितल्याची पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments