दुर्दैवी घटना : कार व दुचाकीचा भीषण अपघात ३ जण जागीच ठार, दाम्पत्यासह माहेरी आलेल्या बहिणीचा दुर्दैवी अंत सोलापूर जिल्ह्यातील घटना-Car-Motorcyle Accident Vit-Karmala Road

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : कार व दुचाकीचा भीषण अपघात ३ जण जागीच ठार, दाम्पत्यासह माहेरी आलेल्या बहिणीचा दुर्दैवी अंत सोलापूर जिल्ह्यातील घटना-Car-Motorcyle Accident Vit-Karmala Road

दुर्दैवी घटना : कार व दुचाकीचा भीषण अपघात ३ जण जागीच ठार, दाम्पत्यासह माहेरी आलेल्या बहिणीचा दुर्दैवी अंत सोलापूर जिल्ह्यातील घटना-


सोलापूर/ प्रतिनिधी रूपेश डोलारे  :   वीट - करमाळा रस्त्यावर दिनांक 4 शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भरधावव कारने  दुचाकीला जोराची धडक (Car Motarcyle Dashing Accident) दिली यात दुचाकी वरील तिघांना तब्बल 100 फूट फरपटत गेले यानंतर दुचाकी ही बाजूच्या चारीच पलटी झाली या अपघातात दुचाकी वरील दांपत्यासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताच्या घटनेबाबत अधिक मिळालेली  माहिती अशी की पुण्याच्या दिशेने (Pune) करमाळ्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कार )क्रमांक Mh-04-101 या वाहनाने करमाळा शहराकडून अंजनडोह गावाकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक mh-45-U-3805 याला जोराची धडक दिली. यावेळी दुचाकी वरील हनुमंत फलफले ,कांचन हनुमंत फलपले ,आणि हनुमंत यांची बहीण स्वाती काशीद यांना तब्बल 100 फूट भरपटत नेले रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या बाभळीच्या झाडाला धडकून ही कार पलटी झाली .करमाळा वीट (Karmala-Vit Road) रस्त्यावरील भुजबळ वस्तीजवळ अपघात घडला असून या अपघाताचा आवाज  ऐकून जवळील असलेल्या कमलाई हॉटेलचे मालक सोमनाथ भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी झुडपातून चारीत  पलटी झालेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताची माहिती मिळताच वीट येथील माजी उपसरपंच अभयसिंहराजे भोसले आणि इतरांनी मिळून नवनाथ जाधव यांच्या स्कार्पिओ(Scriopio) गाडीतून जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात ईनोवा कार मधील प्रवासी जखमी झाली असून ते करमाळा(Karmal Taluka)  तालुक्यातील बालेवाडी येथे जाणार असल्याचे समजते. एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात जीव गमावा लागला आहे या दुर्दैवी घटनेमुळे अंजनडोह गावासह परिसरात शोककळा  पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments