ह्रदय हेलावणारी घटना : भावाला ओवाळून घरी परतणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू-
जालना /प्रतिनिधी रूपेश डोलारे : भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात नंदा मोहन लोखंडे वय (35) राहणार पीर पिंपळगाव तालुका जिल्हा जालना (Jalna) यांचा जागीच मृत्यू झाला गुरुवारी दिनांक 23 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जालना अंबड रोडवरील(Jalna Ambad Road Accident) इंदिवाडी येथे हा भीषण अपघाताची घटना दिली.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पिर पिंपळगाव येथील नंदा मोहन लोखंडे या पती मोहन लोखंडे यांच्यासह भाऊबीज निमित्त भावाला ओवाळण्यासाठी कुंभेफळ पाटी जवळील आपल्या माहेरी गेल्या होत्या तेथून सायंकाळी पाच वाजता परत घरी जाण्यासाठी दोघेही निघाले रस्त्यात एका रिक्षात बसले ही रिक्षा (Autoriksha) जालन्यातील अंबड चौफुलेकडे जाण्यासाठी काही अंतरावर आली असता भरधाव कारने रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत रीक्षा पलटी होऊन नंदाबाई लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला; तर त्यांचे पती मोहन भगवान लोखंडे हे गंभीर जखमी झाले आहेत शिवाय रिक्षातील इतर काही प्रवासी जखमी झाले सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी मोहन लोखंडे यांचा जबाब नोंदवून तालुका जालना पोलिसांनी(Jalna Police Station) सदर कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस जमादार मदन गायकवाड हे करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments