मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील धाब्यावर वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा -Murum Police Station Tugaov-News

Hot Posts

6/recent/ticker-posts

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील धाब्यावर वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा -Murum Police Station Tugaov-News

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील धाब्यावर वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा -


धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे: मुरूम -मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव(Tugaov) फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे.

सोलापूर-उमरगा राष्ट्रीय (Solapur-Umerga National Highway) महामार्गावरील तुगाव मोड येथील एका धाब्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून धाड टाकली

या कारवाईत दोन बांगलादेशी(Bangali Girls) तरुणींची सुटका करण्यात आली असून, हा गैरकृत्याचा अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा मुरूम पोलिस ठाण्यात(Murum Police Station)  गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी आर. एस. गायकवाड करत आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांच्या भुमीकेवर  प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गंभीर आणि घाणेरडे प्रकार खुलेआम सुरू असताना, स्थानिक पोलिसांना याची माहिती कशी नव्हती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुरूम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने  यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments