संतापजनक घटना : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी शिरोढोण पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिराढोण पोलीस ठाण्याचे हद्दीत एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी 2. वा ते 21 ऑक्टोबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गावातील एका तरुणाने शेतातील उसात घेऊन जाऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला तसेच तू ओरडलीस तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिली. अखेर या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली या प्रकरणी आरोपी विरुद्ध दिनांक 21 रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरून भारतीय न्याय संहिता कलम 64 64 2 (l),(M)127,(2),351(2)(3) 6,8,12 बालकाची लैंगिक अपराधापासून संरक्षण (Posco ) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या संताप जनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments