लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : लोहारा तालुक्यातील एका गावातील 26 वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की लोहारा तालुक्यातील एका गावातील 26 वर्ष मुलगी दि.13.11.2021 रोजी दि.25.06.2025 रोजी पावेतो हिस गावातील एका तरुणाने घरामध्ये बोलावून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून लग्नाचे अमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.25.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64 (1), 64(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोहारा पोलीस करत आहेत.

0 Comments