जुन्या वादातून माजी सरपंचाचा भर दिवसा धारदार शस्त्राने खून शेतीच्या वादातून खून झाल्याची चर्चा ,जालना जिल्ह्यातील घटना-
जालना/प्रतिनिधी रूपेश डोलारे : जुन्या वादातून भावकीतीलच काही जणांनी माजी सरपंचाचा तलवार कुऱ्हाडी व चाकुने सपासप वार करून खून केला ही खळबळजळणी घटना दिवसा ढवळ्या जुना जालन्यातील नूतन वसाहत भाजी मार्केट परिसरात जागंडी पेट्रोल पंपा समोर गुरुवार दिनांक 20 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. बाबासाहेब सदाशिव सोमधाने वय 48 राहणार अहंकार देऊळगाव ता. जालना असे मयताचे नाव आहे खून केल्यानंतर तीन आरोपी स्वतःहून कधी जालना पोलीस ठाण्यात (Jalna Police Station) हजर झाले तर एक जण पसार झाला असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,अहंकार देऊळगाव ता. जिल्हा जालना येथील माजी सरपंच बाबासाहेब सोमधाने यांचे गावातील कृष्णा संघाने व इतरांसोबत जमिनीचा वाद होता या वादातून मयत बाबासाहेब सोमधाने व इतराविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Criminal case)आहे; दरम्यान सदर गुन्ह्याची कोर्टात तारीख असल्याने बाबासाहेब सोमधाने हे गुरुवारी सकाळी न्यायालयात गेले होते. कोर्टातील काम संपल्यानंतर दोन साथीधारासह ते कार क्रमांक Mh- 20 बी वाय ७८४१ या वाहनाने गावाकडे निघाले होते. कार अंबड चौफुला वरून वसाहतीकडे वळल्यानंतर बाबासाहेब सोमधाने यांनी कार चालवत असलेले दीपक मस्के यांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी कारमधून उतरून भाजीपाला खरेदी करत असताना त्यांच्या मागावर असलेले आरोपी टाटा सुमो(Tata-Sumo) जीप मधून क्रमांक Mh- 04 जीडी 05 09 आले विवेकानंद शाळेपासून काही अंतरावर त्यांनी सुमो कार उभी करून आरोपी धारदार शस्त्रे घेऊन धावतच भाजीपाला खरेदी करत असलेल्या बाबासाहेब सोमधाने यांच्या जवळ आली आणि काही कळायचे आतच आरोपीने तलवार, कुऱ्हाडी व चाकूने बाबासाहेब सोमधाने यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर पोटावर सपासप वार केले अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कुठलाच प्रतिकार करता न आल्याने बाबासाहेब सोमधाने हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले.
या घटनेमुळे भाजीपाला बाजारात एकच खळबळ उडाली होती काही व्यापारी व ग्राहक भाजीपाला जागेवर सोडून पळाले; दरम्यान सोबत असलेल्या दीपक मस्के व अन्य एकाने घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत सोमधाने यांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर ३ आरोपी मनोहर मच्छिंद्र सोमधाने, मच्छिंद्र बस साहेबराव सोमधाने व सचिन मारुती गाडेकर सर्व रा. अहंकार देऊळगाव हे थेट पोलीस ठाण्यात आले त्यांना ताब्यात घेण्यात आली आहे तर अर्जुन मच्छिंद्र सोमधाने हा मात्र फरार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले .या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी ,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव ,कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे ,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक दिगंबर पवार हे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सुरक्षित केले त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीयतपासणी करता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला दरम्यान याप्रकरणी अहंकार देऊळगाव ग्रामपंचायतीची शिपाई तथा कारचालक दीपक मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे करत आहेत.
जमिनीच्या वादातून खून झाल्याची चर्चा जुन्या वादाची किनार
खून झालेली माजी सरपंच बाबासाहेब सोमधाने यांचा गावातीलच भावकीतील काही जणांसोबत जमिनीचा वाद होता या वादातून मृत बाबासाहेब सोमधाने व त्याची साथीदारांनी कृष्णा सोमधाने व इतरांना मारहाण केली होती. या वादातून मृत बाबासाहेब सोमधाने यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा(Attack of Murder) दाखल आहे .या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे बाबासाहेब सोमधाने यांच्यावर पोलीस प्रशासनाने जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाची तारीख असल्यामुळे ते कारने जालना येथे आले होते ही संधी साधून मारेकर्यांनी पाळत ठेवून बाबासाहेब सोमधाने यांच्यावर हल्ला केला.
घटनास्थळी मोठी गर्दी
नूतन वसाहत भागातील रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला बाजारात सायंकाळी भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी असते .त्यातच भाजीपाला खरेदी करत असताना एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली पोलिसांनी घटनास्थळ सुरक्षित केल्यानंतर एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली त्यामुळे पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वेळ लागला.

0 Comments