धक्कादायक घटना: कापूस वेचणीसाठी निघालेल्या मायलेकीचा नदीत बुडून मृत्यू, तिरू नदी व बॅरेज मधील पाणी अचानक सोडल्याने घडली दुर्घटना लातूर जिल्ह्यातील घटना-Latur News
लातूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : नदी ओलांडून शेतकऱ्याचा कापूस वेचण्यासाठी रोजंदारीसाठी निघालेल्या माय-लेकीचा तिरु नदीपात्रात आल्यानंतर पाण्याचा प्रवाह अचानक वाढला यात वाहून गेल्याने दोन्ही माय लेकिचा मृत्यू झाल्याची दुर्घटना जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे तिरु नदीच्या पात्रात सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. कौशल्या अजय वाघमारे वय (35) व रुक्मिणी अजय वाघमारे वय (14) दोघेही राहणार मरसंगी तालुका जळकोट जिल्हा लातूर अशी वाहून मृत्यू पावलेल्या माय लेकींचे नावे आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार कौशल्या अजय वाघमारे आणि रुक्मिणी, अजय वाघमारे या दोघीही मरसांगवी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कापूस वेचण्यासाठी मंजुरीने निघाल्या होत्या कापसाचे शेत हे नदीच्या पलीकडे होते शेताकडे जात असताना नदीत पाणी कमीच होते मात्र तिरु नदीतील व बॅरेज मधील पाणी अचानक सोडल्याने पाण्याचा प्रवाह अचानक वाढला यामुळे या दोघी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या दुर्दैवाने या दोघींचे मृत्यू झाला सदरील मायलेकी वाहून गेल्याची माहिती मिळतात गावातील नागरिक नदीपत्राकडे धावली मायलेकींना काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्या दोघींचा ही मृत्यू झाला होता यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. तिरू प्रकल्पातून व बॅरेज मधून एकाच वेळी पाणी सोडल्याने नदीच्या पाञात अचानक वाढ झाली यामुळे पाण्याचा प्रवाहाचा अचानक वाढला यात त्या दोघीही वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला अशी माहिती मर सांगवीचे सरपंच रवी गोरखे व चेअरमन उमाकांत इमडे यांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments