फुलवाडी येथील यात्रेमध्ये अध्यक्षच्या सांगण्यावरून अपमानित केल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Naldurg Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

फुलवाडी येथील यात्रेमध्ये अध्यक्षच्या सांगण्यावरून अपमानित केल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-Naldurg Police Station Crime News

यात्रेमध्ये अध्यक्षच्या सांगण्यावरून अपमानित केल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी शिवारातील धनगरवाडी पाटी येथे  यात्रेमध्ये अध्यक्षाच्या सांगण्यावरून आम्हास अपमानित का केले या कारणावरून दोन गटात चांगलीच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना दि,२१ रोजी घडली आहे.याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 याप्रकरणी  बळीराम बाबु हिप्परगे (रा. फुलवाडी तालुका तुळजापूर )यांनी फिर्यादीत असे म्हटले आहे की आरोपी नामे-चेतन विश्वनाथ हांडगे, विजय हरी हांडगे, संकेत महादेव कावळे, विठ्ठल विश्वनाथ हांडगे, सर्व रा. फुलवाडी, गणेश उर्फ तम्मा मुळे रा. अणदुर, रवि टिळेकर रा. अणदुर, पृथ्वीराज मुळे, विश्वनाथ राम हांडगे, समर्थ हिप्परगे, नागनाथ मारुती हांडगे, सागर झुरळे, सर्व रा. फुलवाडी शरण मुळे रा अणदुर, अजय हांडगे,रा. फुलवाडी, शिवराज निवृत्ती बोंगरगे रा. अणदुर यांनी शुक्रवारी दि.21 रोजी 22.30 वा. सु. धनगरवाडी पाटी येथील हांडगे वस्ती येथे फिर्यादी  बळीराम बाबु हिप्परगे, रा. फुलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी यात्रेमध्ये अध्यक्ष्याच्या सांगण्यावरुन काम करुन आम्हाला अपमानीत केले या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तर गुरुराज हांडगे, सुदर्शन हांडगे हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी मारहाणा केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम हिप्परगे यांनी दि.22.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1),189, 189(2), 191(2),191(3), 190, 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

याच प्रकरणी शिवराज बोंगरगे (रा.अणदुर ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आरोपी नामे-गुरुराज नागनाथ हांडगे, सुदर्शन संजय हांडगे, रामानंद रिंगणे, कल्लेश्वर महादेव हिप्परगे, बळी बाबुराव हिप्परगे, श्रीशैल हिप्परगे, रामचंद्र हांडगे सर्व रा. फुलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21 शुक्रवारी रोजी 23.40 वा. सु. महाराजा हॉटेल धनगरवाडी पाटी येथे फिर्यादी नामे-शिराज निवृत्ती बोंगरगे, वय 20 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता, विळुची काठी, उस दगडाने मारहाण करुन  जखमी केले. तर शरद मुळे त्याची आई, काका, बहिण यांनाही नमुद आरोपींनी मारहाणा केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवराज बोंगरगे यांनी दि.22.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1),189, 189(2), 191(2),191(3), 190, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments