नांदेडमध्ये सैराट ! मुलीच्या वडील, भावांनी गोळ्या घालून प्रियकराची केली निर्गुण हत्या; प्रियसीने मृतदेह सोबत बांधली लग्न गाठ! तीन वर्षाच्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट-
नांदेड : माझ्या वडिलांनी व भावाने माझ्या प्रियकराला ठार मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर जिंकला असे म्हणत मुलीने टाहो फोडला मुलाच्या घरासमोर मृतदेह आणल्यानंतर अंत्यविधी होण्याअगोदर तिने जे केले ते पाहून सर्वांचेच मन हेलावले. प्रियकरांच्या मृतदेहाला आलिंगन देत तिने चक्क लग्न गाठ बांधली या हृदय द्रावक घटनेमुळे अंत्यविधीसाठी उपस्थित सर्वांचे डोळे पानावले .गुरुवारी दि,२७ रोजी प्रेम प्रकरणातून नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती समोर आली मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करत वडिलांसह भावाने प्रियकराला गोळ्या घालून ठार केले या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे वडिलांसह भावांना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी भावना प्रेयसी तरुणीने यावेळी व्यक्त केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली तसेच त्याच्या डोक्यात फरशी मारून चेहरा विद्रूप करण्यात आला होता. या घटनेनंतर इतवारा परिसरात दहशत निर्माण झाली पोलिसांनी आरोपींना त्वरित अटक केल्यानंतर हत्तेमागील कारण समोर आले. आपल्या मुलीसोबत असलेले प्रेम प्रकरण मुलीच्या घरच्यांना मान्य नसल्यामुळे वडील व भावाने हत्याकांड घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या घरच्यांनी सदर तरुणाची हत्या केली त्याच मुलीने शुक्रवार दिनांक 28 रोजी अनोख्या पद्धतीने उत्तर दिले शुक्रवारी मुलाचा मृतदेह घरी आणल्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू असताना तिथे ही मुलगी धडकली आणि टावर थोडं तिने प्रेम करायला मृतदेहांसोबत लग्न केले प्रेम प्रकरणाला विरोध असल्याने रागातून वडील आणि भावाने त्याची हत्या केली पण ते हरले माझा प्रियकर जिंकला असे म्हणत आपल्या घरच्यांच्या विरोधात तिने तीव्र संताप व्यक्त केला .मयत तरुणावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीच्या वेळी तिने धाडसी निर्णय घेतला चक्क मृत देहांसोबत लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला .त्याच्या हाताने कपाळला कुंकू लावून मंगळसूत्र घातल्याची दिसून आले ही घटना हृदय तोडून टाकणारी होती. या घटनेने समाज मनसुन्न झाले त्याचबरोबर या भावनाशील प्रसंगांमध्ये अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. केवळ परजातीय असल्याच्या भावनेतून झालेल्या या प्रेम कहाणीचा असा शेवट समाजाला देखील विचार करायला लावणार आहे. रागाच्या भरात आणि खोट्या प्रतिष्ठेपायी आज दोन कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था न बघवणारी आहे. या घटनेमध्ये गुन्हा दाखल झाला आरोपी अटक झाली पण आता पुढे काय? हे ही दोन्ही कुटुंबासाठी तितकेच केल्याशिवायक आहे सध्याचे आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जग जवळ येत असल्याचा युगात मानवतेला कळिमा फासणाऱ्या या घटनेने पुरोगामी महाराष्ट्राला शर्मिने मान खाली घालवायला लावणारी आहे.
माझ्या घरच्यांनी तुला ठार केले पण तू जिंकलास म्हणत फोडला मुलीने टाहो
प्रियसी चे दोन भाऊ आणि मृत सक्षम चांगले मित्र होते त्यांचे नेहमी घरी येणे जाणे असल्याने दोघांचे प्रेम संबंध जोडले दोघांनीही सात जन्माची गाठ बांधण्याच्या अनाभाखा घेतल्या एकीकडे हे प्रेमी युगल सुखी संसाराचे स्वप्न पाहत असताना तिकडे तिच्या घरच्यांच्या मात्र या प्रकरणाला तीव्र विरोध वाढत गेला असे असताना सज्ञान असलेली दोघेही एकमेकापासून वेगळे होण्याचा विचारही करू शकत नव्हते त्यामुळे घरच्यांचे समजण्याचे प्रयत्न कमी पडले आणि अखेर या तीन वर्षाचे प्रेम कहाणीचा रक्तरंजित शेवट झाला वडील व दोन भवानी मिळून सक्षम वरती गोळ्या झाल्याचे सांगितले जात आहे सक्षम या जगात नसला तरी आम्ही कायम सोबत असू अशी तरुणी मीडियाशी बोलताना दायमूकडून सांगत होती.
प्रेयसी मागे हटली नाही
आपल्या प्रेम कहाणीचा दुर्दैवी शेवट झाल्यानंतरही तो मागे हटला नाही प्रे कराच्या मृतदेहाला कुंकू लावून तिने मंगळसूत्र घातले काळीज पळवून टाकणारा हा प्रसंग पाहून सर्वांनाच गहिवरून आले प्रेम आंधळे असतं असे म्हणतात त्याचा प्रत्यय येथे पहावयास मिळाला.
आंचलच्या वडिलांसह 5 जणांना अटक
पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामिडवार यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर वय (४३)गजानन बालाजीराव मामिडवार,साहील ठाकूर वय (२५) सोमाश लखे,वेदांत कुंदेकर वय(३८) अशी आरोपींची नावे आहेत. सक्षम ताटे आणि आणि आंचल यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हे कळताच आंचलचे वडील गजानन भयानक संतापले होते. सक्षम हा वेगळ्या जातीचा असल्याने त्यांना आंचलचे सक्षमसोबतचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्या खंडात आतापर्यंत सहा आरोपी असून त्यांना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी दिली आहे.आरोपींना न्यायालयातील दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

0 Comments