नळदुर्ग - तुळजापूर रोडवरील लहान तीर्थ जवळ कार व व मोटरसायकलचा भीषण अपघात; बसवंतवाडी येथील 24 वर्षीय युवक ठार-
धाराशिव: नळदुर्ग तुळजापूर महामार्गावरील लहान तीर्थ जवळ एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भिषण धडकेत तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दिनांक 21 रोजी घडली ओंकार पप्पू मुळूक असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध दिनांक 23 रोजी विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील रहिवासी असलेले ओंकार पप्पू मुळुक रविवार दिनांक 21 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मोटरसायकल वरून क्रमांक एम एच २५ बीबी 97 05 प्रवास करत होते. लहान तीर्थाच्या पुढे जात असताना समोरून येणाऱ्या वेरना कारच्या (क्रमांक टी एस 10 इ एस 22 19 )चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगात निष्काळजीपणे चालवून ओंकार यांच्या मोटरसायकला समोरून भीषण धडक दिली .ही धडक इतकी भीषण होती की गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र जखमी गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी अपघाती घटनेमुळे बसवंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .या अपघातानंतर मयताचे भाऊ अजित पप्पू मुळक यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम 281, 125 (ए), 125(बी), 106 सह 184, 134 (अ)(बी) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments