रुई ढोकी येथील विवाहिता खून प्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी, प्रेम संबंधातून काढला होता काटा, मृतदेह पेट्रोल ओतून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न-
धाराशिव : तालुक्यातील रुई ढोकी शिवारातील रेल्वे फाटकाजवळ दिनांक 27 रोजी विवाहतेतिचा जळालेला अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशन (Dhoki Police Station) येथे पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करून एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. अपहरण करून मृतदेह जाळून टाकल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. अनिकेत कांबळे असे संशयित आरोपीचे नाव आह.
याप्रकरणी पोलिसांनी शनिवार दि, 29 रोजी आरोपी तरुणास अटक केली आहे त्यास रविवार दि, 30 रोजी धाराशिव येथील न्यायालयात हजर केले असता त्यास 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी(PCR) सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील ढोकी((Dhoki) शिवारातील रेल्वे फाटका जवळ 26 वर्षीय विवाहित तरुणांचा खून करून तिला जाळण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 27 रोजी निदर्शनास आली होती. या प्रकरणी ढोकी पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक(SP) रितू खोकर यांच्या मार्शनाखाली ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी दोन पथके रवाना करून तपास सुरू केला होता.
पोलीस तपासात या गुन्ह्यातील महिलेचे नाव राणी विशाल गायकवाड वय 26 (रा. मातोबा नगर वाकड पुणे) असल्याचे स्पष्ट झाले वाकड पोलिसांनी ((Wakad Police) याप्रकरणी वाकड येथून संशयित आरोपी अनिकेत गायकवाड यास गुरुवार दिनांक 27 रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीस शनिवार दि, 29 रोजी वाकड पोलिसांकडून ढोकी पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवार दि, 30 रोजी पोलिसांनी त्याची कसुन चौकशी केली. यावेळी अनिकेत कांबळे या घटनेची हकीगत सांगितल अनिकेत व राणी यांचे प्रेम संबंध(Lovecontact) होते मी तुझ्या पाशीच राहणार अशी ती त्यास म्हणत होती त्यामुळे अनिकेतनेच तिला चल लातूरला रूम करून ठेवतो असे सांगून व्हॅगनार गाडीत बसवले तिला ढोकी नाका तडवळा रोड येथे बुधवारी दिनांक 26 रोजी पहाटे 4 वाजता आणले तिला रोडच्या कडेला नेऊन लोखंडी रोडने डोक्यात सपासप वार करून तिचा खून केला नंतर गाडीतील पेट्रोल टाकून तिला जाऊन टाकले तो तिचे प्रेत तेथेच टाकून पळून गेला अशी कबुली अनिकेतने ढोकी पोलिसांसमोर दिली. त्यास रविवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे .या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे व पोलीस कर्मचारी श्री कळसाई हे करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत महिलेचे नातेवाईकांनी ढोकी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली या आरोपीस कठोरात कठोर शासन करण्याची मागणी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

0 Comments