सोलापूर येथील डॉ. शिरीष वळसंनकर आत्महत्या प्रकरणात टॉवर लोकेशन ,कागदपत्रे सादर करा -सत्र न्यायालयाचे आदेश-Dr.Shirish Valasangakar Suicide Matter Session Order

Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर येथील डॉ. शिरीष वळसंनकर आत्महत्या प्रकरणात टॉवर लोकेशन ,कागदपत्रे सादर करा -सत्र न्यायालयाचे आदेश-Dr.Shirish Valasangakar Suicide Matter Session Order

सोलापूर येथील डॉ. शिरीष वळसंनकर आत्महत्या प्रकरणात टॉवर लोकेशन ,कागदपत्रे सादर करा -सत्र न्यायालयाचे आदेश-


सोलापूर : सोलापुरात गाजलेल्या डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आता मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सह 7 जणांच्या मोबाईल सी डी आर (CDR)व टॉवर लोकेशन (Tower Location) बाबत कागदपत्रे सादर करण्याबाबत सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यासह सात जणांचे घटने पूर्वीचे पाच महिन्याचे सीडीआर व टॉवर लोकेशन संबंधित मोबाईल कंपन्यांच्या नोडल ऑफिसरने (Nodal Officer)न्यायालयात सादर करावेत असा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी पारित केला आहे. या प्रकरणाची हकीगत अशी की 18 एप्रिल 2025 रोजी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येच्या गुन्ह्यात मनीषा मुसळे -माने हिला अटक करण्यात आली .सध्या तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे .

दोषारोपपत्राचे सविस्तर अवलोकन केले असता तपास अधिकारी याने डॉ. शिरीष वळसंगकर व इतर साक्षीदारांचे टॉवर लोकेशन याचे फक्त चार दिवसाचीच कागदपत्रे दाखल केली होते असे दिसून आली .या सी डी आर व टॉवर लोकेशन मधून काही बाबी निदर्शनास आल्या त्या म्हणजे डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्यात व साक्षीदार राऊत यांच्या दरम्यान तीन कॉल झाले होते तर दिनांक 16 ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये एका मोबाईल नंबर बरोबर डॉ. वळसंगकर यांचे दहा कॉल व एक एसएमएस झाला होता.या कॉलचा कालावधी मोठा होता ही बाब निदर्शनास आल्यानंतर मनीषा मुसळे माने यांचे  वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत न्यायालयात डॉ. त्यांचे यांच्यासह सात जणांचे सीडीआर व टावर लोकेशन हे न्यायालयात सादर करावे असा अर्ज न्यायालयास दाखल केला या अर्जावर सरकार पक्षाने हरकत घेतली.

सदर अर्ज कामे तपास अधिकारी यांनी त्यांचे म्हणणे सादर केले व 10 कॉल करणारा विशिष्ट मोबाईल नंबर हा आर राऊत या व्यक्तीचा असल्याची नमूद केले आरोपी मनीषा मुसळे हिच्या मार्फत प्रशांत नवगिरे  यांनी असा युक्तिवाद केला की; सरकार पक्षाच्या कथनाप्रमाणे डॉ. श्री वळसंगकर आत्महत्या पूर्वी तीन कॉल हे साक्षीदार पी राऊत यांच्याबरोबर केल्याची दिसून येते तसेच दिनांक 16 ते 18 एप्रिल या कालावधीत डॉक्टर शिरीष  वळसंगकर यांचे आर राऊत या व्यक्तीबरोबर दहा वेळा संभाषण झाले होते .त्या संभाषणाचा कालावधी देखील मोठा दिसून येतो घटने पूर्वी एवढे मोठे संभाषण झाले असल्यामुळे नेमकी ती व्यक्ती सदर दिवशी कुठे होती ?ती व्यक्ती नेमकी कोण ?आहे व त्या व्यक्तीबरोबर कोणत्या कारणामुळे संभाषण झाले आहे .

या बाबी आरोपीच्या बचावाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्या अभिलेखावर  येणे गरजेचे आहे त्या दृष्टीने आरोपीला तिचा योग्य तो बचाव भविष्यात करता येईल सदरची सीडीआर व टॉवर लोकेशन दाखल करण्याबाबत आदेश न झाल्यास मोबाईल कंपन्या विशिष्ट कालावधीनंतर सी डी आर ओ टॉवर लोकेशन चा डाटा डिलीट करतात त्यामुळे सदरचा डाटा न मागवल्यास आरोपीवर अन्याय होणार आहे असा युक्तिवाद(Arguments) करून न्यायालयात उच्च न्यायालयाची (High Court)निवाडे सादर केले .

आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद व सादर केलेली निवाडे विचारात घेऊन न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी डॉक्टर वळशंकर यांच्या 7 जणांचे डिसेंबर 2024 ते मे 2025 या कालावधीमधील सीडीआर व टावर लोकेशन दिनांक 1 ते 17 जानेवारी पर्यंत न्यायालयात दाखल करण्याचा आदेश संबंधित कंपन्यांच्या नोडल ऑफिसर यांना दिलेला आहे यात आरोपीतर्फे adv. प्रशांत नवगिरे  Adv. सिताराम पाटील Adv. चेतन रणदिवे हे काम पाहत आहेत.

या सात जणांचे टॉवर लोकेशन व सीडीआर तपासणार

खटल्याच्या सुनावणीपूर्वी ॲड. नवगिरे यांनी डॉ. शिरीष यांच्यासह त्यांचा मुलगा डॉ. अश्विन, मुलगी नेहा, आई डॉ. उमा व सून डॉ. शोनाली यांच्यासह अन्य दोघे, अशा एकूण सात जणांचे १ डिसेंबर २०२४ ते आत्महत्येच्या दिवसापर्यंतचे मोबाईल टॉवर लोकेशन व ‘सीडीआर’ जतन करून ठेवावेत किंवा न्यायालयात सादर व्हावेत, अशी मागणी केली होती. ज्यामुळे मनीषा निर्दोष असल्याची बाजू आम्हाला भक्कमपणे मांडता येईल, असा युक्तिवाद ॲड. नवगिरे यांनी न्यायालयात केला होता. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली आहे.

Post a Comment

0 Comments