दिर भावजय च्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या चुलत्यास पोलीस कोठडी-Boys Murder on unkle in PCR

Hot Posts

6/recent/ticker-posts

दिर भावजय च्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या चुलत्यास पोलीस कोठडी-Boys Murder on unkle in PCR

तामलवाडी : दिर -भावजयच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या चुलत्यास पोलीस कोठडी-


तुळजापूर : तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीत प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या 13 वर्षीय  मुलाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची थरारक घटना येथील दोन तलावानजीक दिनांक 5 रोजी उघडकीस आली होती .या प्रकरणातील आरोपी चुलत्यास तामलवाडी  पोलिसांनी अटक करून तुळजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या घटनेचा तपास तामलवाडी पोलिसांनी शिताफितीने करून 24 तासात तपासाची चक्री फिरून ओंकार कांबळे या आरोपी चुलत्यास  उमरगा तालुक्यातील कोळसुर गावातून ताब्यात घेऊन अटक केली.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की तामलवाडी शिवारात कदम यांची शेती दत्ता कोरे हा बटाईने शेती करीत होता .तेथे उमरगा तालुक्यातील कोळसुर येथील ओंकार देविदास कांबळे हा भावजयीला  घेऊन सालगडी म्हणून कामास होता दरम्यान भावजयी ज्योती कांबळे यांचा तेरा वर्षाचा मुलगा कृष्णा उर्फ सदानंद कांबळे हा आईकडेच राहिला होता तो अधून मधून वडिलाणांकडेही राहिला जायचा आपल्या आईच्या आणि चुलतेच्या प्रेमसंबंधाची माहिती वडिलांना सांगायचा .यामुळे याचा राग मनात धरून चिडून 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चुलता ओमकार कांबळे यांनी कृष्णा कांबळे यांचा कुराडीने घाव घालून निर्गुन खून केला. या घटनेचा तपास तामलवाडी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तपास करून आरोपी ओमकार कांबळे या 24 तासाच्या ताब्यात घेतले. आरोपी ओंकार कांबळे यास बुधवारी सायंकाळी तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली  आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हनुमंत कोरे, नितीन भोसले ,उमेश माने ,जुबेर काझी, दिनकर दोघी यांचे पथक अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments