मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न-
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
लेक वाचवा - लेक शिकवा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.
""""”""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथे शनिवार दि.3 जानेवारी रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत भारतीय पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री मुक्तीदात्या सावित्रीमाई फुले यांची जयंती विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली.प्रथम शाळेतील विद्यार्थिनी तथा सावित्रीमाईच्या लेकींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची अर्थात सावित्रीमाईंच्या लेकींची भाषणे झाली. नाट्यीकरण, नृत्य, अभिनय माध्यमातून *लेक वाचवा - लेक शिकवा* अभियानाची सुरुवात करण्यात आली. सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील प्रतिसावित्री मा.पवार मॅडम, मा.माने मॅडम, मा. पुदाले मॅडम, मा.इंगळे मा.भोसले मॅडम यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन मा.इंगळे मॅडम यांनी केले. अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय तानाजी गायकवाड सर यांनी केले. याप्रसंगी मा.एकनाथ नैताम सर, मा.सतिश साखरे सर , सतिश ढोणे सर व महिला पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments