सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी ! किरकोळ शेतकामाच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून--
जालना : शेतकामाच्या किरकोळवादातून सख्या भावानेच मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्गुण हत्या केल्याची धक्कादाय घटना रांजना येथे दिनांक 15 जानेवारी रोजी घडली. हट्टा पोलिसांनी आपल्या चाकणक्षपणे आणि तांत्रिक कौशल्याने अवघ्या दोन तासात त्या खुनाचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वसमत तालुक्यातील रांजणा येथे दिनांक 15 जानेवारी रोजी पहाटे हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रांजणा गावातील नामदेव सावळे यांच्या शेत आखाड्यावर त्यांचा मुलगा नवनाथ नामदेव सावळे वय 25 वर्षे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात-इसमानी डोक्यात तीक्ष्ण हत्यारेंनी वार करून ही हत्या केल्याची माहिती मिळतात परिसरात खळबळ उडाली होती पोलिसांनी तातडीने तपासाची चक्री फिरवून या घटनेचा उलगडा अवघ्या दोन तासात केला.
तपासाची चक्री फिरवली
या घटनेचे गांभीरे ओळखून हट्टाचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी वरिष्ठांना तात्काळ पाचारण केले पोलीस अधीक्षक निलाभ रोहन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्यासह, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला या खुनाचा कोणताही सुगावा लागत नव्हता .पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा केला असता आडोशाला लपवून ठेवलेल्या रक्ताने माखलेली कुऱ्हाड हस्तगत केली. मयत नवनाथ आणि त्याचा धाकटा भाऊ गजानन नामदेव सावळे वय 23 वर्षे यांच्यात नेहमी घरगुती आणि शेतीच्या कामावरून वाद होत असत. तपास सुरू असताना आरोपी गजानन हा पोलिसांना संशय येऊ नये अशा पद्धतीने वावरत होता मात्र पोलिसांच्या अनुभवी नजरेतून त्यांचे संशयास्पद वर्तन सुटले नाही अखेर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
आपल्या भावाचा खून केल्यावर पुन्हा घरी येऊन शांत झोपला
मृत नवनाथ हा शेतात झोपण्यासाठी गेला होता, तर संशयित गजानन व त्याचे आई, वडील रांजोना येथे घरी झोपले होते. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास गजानन याने घराला बाहेरून कुलूप लावून शेतातील आखाडा गाठला. त्या ठिकाणी झोपेत असलेल्या नवनाथवर त्याने दगडाने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुन्हा घरी येऊन तो झोपी गेला.
शेतकामातील वादातून झाला खुन
प्रकरणात शेती कामातील कामे करण्याच्या कारणावरून आणि सततच्या घरगुती वादातून संतापलेल्या गजानन मध्यरात्री झोपेत असलेल्या मोठ्या भावाच्या डोक्यात कोणाला घालून त्याची हत्या केली
या पथकाने बजावली कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलाभ रोहन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, आणि डी वाय एस पी राजेंद्र केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे उपनिरीक्षक माधव जीवारे संजय केंद्रे हकीम शेख संदीप सुरवसे प्रीतम चव्हाण गणेश सूर्यवंशी यांच्यासह पोलीस पथकाने अवघ्या दोन तासात खुनाचा उलगडा केला पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे विशेष संविधान केले आहे आरोपी गजानन सावळे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास करत आहेत

0 Comments