शेतवाटणीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एकास कोयत्याने मारहाण करून जखमी - तामलवाडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल -
धाराशिव : शेतवाटणीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीत घडली आहे याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटकही करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-वैभव उर्फ शंकर विश्वनाथ लिंगफोडे, वय 24 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.14.01.2026 रोजी 23.00 वा. सु.सावरगाव येथे फिर्यादी नामे-चैतन्य रघुनाथ लिंगफोडे, वय 25 वर्षे, रा.सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने शेतीची वाटणीचे जुने भांडणाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-चैतन्य लिंगफोडे यांनी दि.16.01.2026 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन पो ठाणे तामलवाडी येथे भा.न्या.सं.कलम 109, 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन तामलवाडी पोलीसांनी गुन्हा तपासा दरम्यान आरोपी नामे वैभव उर्फ शंकर विश्वनाथ लिंगफोडे, वय 24 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यास अटक केली. या घटनेचा अधिक तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

0 Comments