तुळजापूर शहरातील हुतात्मा स्मारक ते आर्य चौक किसान चौकी रस्ता रुंदीकरण करण्यात यावा नगरसेवकांचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी-
तुळजापूर : शहरातील हुतात्मा स्मारक ते आर्य चौक ते किसान चौकी रस्ता रुंदीकरण बाबत येथील नगरसेवकांनी माननीय उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात असे नमूद केली आहे की, तुळजापूर येथील हुतात्मा स्मारक ते आर्य चौक ते किसान चौकी येथील रस्ता रुंदीकरण साठी सहाय्यक संचालक नगर रचना धाराशिव यांच्या पत्राच्या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणाबाबत विविध प्रक्रियेचा अवलंब करून व भुसंपादनाची पुढील कारवाई हुतात्मा स्मारक ते आर्य चौक ते किसान चौकी या रस्त्याचे रुंदीकरण करावे व नागरिकांची व येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळावी व त्वरित कारवाई करून रस्त्याच्या रुंदी करण्याचा कामाची सुरुवात करावी असे निवेदनात नमूद केली आहे .या निवेदनावर नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, रणजीत चंद्रकांत इंगळे, आनंद नानासाहेब जगताप ,अक्षय धनंजय कदम ,प्रगती गोपाळ लोंढे यांच्या स्वाक्षरी आहे.



0 Comments