तुळजापूर :श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर तर्फे मकर संक्रांतीनिमित्त डिजिटल हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न -Tuljapur Digital Function Celebrate

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर :श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर तर्फे मकर संक्रांतीनिमित्त डिजिटल हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न -Tuljapur Digital Function Celebrate

तुळजापूर :श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर तर्फे मकर संक्रांतीनिमित्त डिजिटल हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न 


 तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे : श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूर यांच्यातर्फे मकर संक्रांतीनिमित्त डिजिटल हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आले. या अभिनव उपक्रमाला तुळजापूर शहरातील अनेक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एआय (AI) च्या माध्यमातून महिलांना डिजिटल हळदीकुंकू तसेच हलव्याचे दागिने डिजिटल स्वरूपात देण्यात आले. यासोबतच पारंपरिक पद्धतीनेही हळदीकुंकू देऊन संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा सुंदर संगम साधण्यात आला.

या कार्यक्रमासाठी श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूरच्या संचालिका अनुराधा नाईक, सौ. उषा मोहिनीराज नाईक तसेच सौ. तृप्ती नवाडे यांनी उपस्थित महिलांना डिजिटल तसेच पारंपरिक हळदीकुंकू दिले. डिजिटल हळदीकुंकूच्या आयोजनासाठी एमकेसीएलचे मा. नटराज कटकधोंड सर तसेच जिल्हा समन्वयक जेवळीकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आजच्या डिजिटल युगात महिलांमध्ये तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणे, एआय सारख्या आधुनिक संकल्पनांची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे श्री समर्थ कॉम्प्युटर्स तुळजापूरच्या संचालिका अनुराधा नाईक यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments