फिरायला घेऊन जातो म्हणून अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार ; धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Crime News Update
धाराशिव : एका अल्पवयीन मुलीला धाराशिव तालुक्यातील गावातीलच एका तरुणाने मोटरसायकलवर बसवून फिरायला घेऊन जातो असे म्हणून जबरदस्तीने नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दिनांक 1 जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 14 रोजी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय मुलगी दि.01.01.2026ते 19.00 रोजी हिस गावातील एका तरुणाने त्याचे मोटरसायकलवर फिरायला घेवून जातो असे म्हणून लॉजवर घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेची आई यांनी दि.14.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-137(2), 64(2) सह पोक्सो कलम 4, 6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास आनंद नगर पोलीस करत आहेत.

0 Comments