/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> वाढदिवसाला न बोलावल्याने नैराश्य; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या, कुंबेफळ गावात खळबळ”-Beed News

Hot Posts

वाढदिवसाला न बोलावल्याने नैराश्य; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या, कुंबेफळ गावात खळबळ”-Beed News

वाढदिवसाला न बोलावल्याने नैराश्य; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या, कुंबेफळ गावात खळबळ”-Beed News 


बीड (प्रतिनिधी): मित्रांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलावले नसल्याच्या कारणातून आलेल्या तीव्र नैराश्यातून अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश उद्धव भणगे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश भणगे याने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घराच्या छतावर विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळाने त्याची प्रकृती बिघडल्याने तो रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महेशचे मित्रांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या एका जिवलग मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्याला निमंत्रण देण्यात आले नव्हते. नेहमी मित्रपरिवारात सक्रिय असणाऱ्या महेशला या गोष्टीचा मनावर मोठा आघात झाला होता.

आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मोबाईलवर “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” असा भावनिक स्टेटस ठेवून आपली व्यथा व्यक्त केली होती. या स्टेटसमुळे त्याच्या मनातील वेदना स्पष्ट होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

महेशच्या वडिलांनी त्याच्या भविष्यासाठी शेती विकून त्याला कपड्याचे दुकान सुरू करून दिले होते. मात्र, आयुष्याच्या ऐन उमेदीत घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.



Post a Comment

0 Comments