तुळजापूर तालुक्यात शिवसेनेला बळ; अनदूरसह चार गावांतील 21 जणांचा पक्षात जाहीर प्रवेश-
अणदुर, दि. 17 ऑगस्ट 2026 : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तुळजापूर तालुक्यातील अनदूर, फुलवाडी, खुदावाडी आणि चिवरी येथील 21 जणांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संबंधित गावांमध्ये शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळाल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात रतन बनसोडे, महादेव कर्पे, प्रवीण गुंड, बालाजी कांबळे, मल्लिनाथ घोडके, दत्तात्रय एडके, तानाजी सोमवसे, काशिनाथ कांबळे, महेश लंगडे, मारुती हिप्पर्गे, मल्लिनाथ हजारे, संकेत कांबळे, चंद्रकांत स्वामी, अक्षय हजारे, योगेश कांबळे, रोहित धबाले, बलभीम गायकवाड, नंदू काळुंके, राजू इट्टलकर, महादेव शिंदे आणि मारुती बनसोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
युवा नेते ऋषिकेश भैया मगर, काटीचे सरपंच सुजित भैय्या हंगरकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन विकास जाधव, तसेच बाळू घुगे, गणेश देवसिंगकर, राहुल मुळे आणि शिवराज घोडके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर चार गावांतील 21 जणांचा हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. પક્ષात सहभागी झालेल्या सर्व नवनियुक्त शिवसैनिकांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
नवनियुक्त शिवसैनिकांचे स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


0 Comments