अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; मारहाण, जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल - तुळजापूर तालुक्यातील घटना-Crime News
तामलवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल; पीडित मुलाची ओळख गोपनीय
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील : गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने शेतात नेऊन मारहाण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १३ सप्टेंबर २०२६ रोजी घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने १४ वर्षीय मुलाला जबरदस्तीने शेतात नेले. तेथे त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून हातपाय बांधण्यात आले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित मुलाच्या चुलत्यालाही जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 127(2), 115(2), 352, 351(2)(3), बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (POCSO) 2012 मधील कलम 4, 8, 12 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(v) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करीत आहेत. अल्पवयीन पीडिताची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.
0 Comments