लक्ष्मीपूजनाला ग्रामीण भागातील 'लक्ष्मी' केरसुणीचा मान कायम,
तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स: हिंदू धर्मात प्रत्येक सणाला वेगवेगळे महत्त्व आहे यातील दिवाळी हा मोठा सण मानला जातो .दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रथम लक्ष्मी म्हणून केरसुणीचे मनोभावे पूजन केले जाते नंतर इतर वस्तूचे पूजन केले जाते. या दिवशी केरसुणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू विकत घेऊन त्याची लक्ष्मी म्हणून पूजा करण्याची प्रथा आजही कायम आहे, लक्ष्मी पूजन झाल्यानंतर झाडू स्वच्छ जागेमध्ये उभा करून त्याला हळद कुंकू लावून पूजा करतात त्यानंतर रात्री उशिरा त्या झाडूने घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढली जाते अशी परंपरा आहे. मात्र काळाच्या ओघात सिमेंटचे जंगले आली अन् गुळगुळीत फरशी आली आणि दारासमोरील अंगण नाहीसे झाले त्यामुळे केरसुणी हद्दपार होत चाललेली दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये सिंदीच्या झाडांची संख्या कमी होत चालल्यामुळे केरसुणी व्यवसायिकाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लक्ष्मी व्यवसायाला आता घरघर लागल्याचे दिसून येत आहे.
------------------------------------------------------------
बालाघाट न्युज टाइम्सच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
0 Comments