परतीच्या पावसामुळे झेंडूची फुलशेती धोक्यात ,
यंदा दिवाळीत फुलांचा सुगंध महागणार
उस्मानाबाद/बालाघाट न्युज टाइम्स: उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे विविध ठिकाणी असलेल्या झेंडूच्या फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झेंडूच्या शेतीमध्ये पाणी साचल्याने झेंडूच्या पिकावर विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे फुल शेती धोक्यात आली आहे. सध्या बाजारात फुलांचे आवक कमी होत असून ऐन दिवाळीत फुलांचा भाव वाढण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत फुल शेती करतात, मात्र मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने फुल शेतीमध्ये पाणी साचले आहे, पाण्याचा निचरा होत नसल्याने फुल शेती धोक्यात आली आहे फुलांची झाडे पिवळी पडून जमिनीवर कोलमडून पडत आहेत त्यामुळे यंदा दिवाळीत विक्रीसाठी जाऊ शकत नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे, एकंदरीत सणासुदीच्या काळात फुल पिके वाया गेल्याने शेतकरी संकटात संपला आहे. एप्रिल मध्ये लागवड केलेली फुल पीक दसरा दिवाळीमध्ये विक्री करत असतात मात्र परतीच्या पावसाने फुल शेतीचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर फुल शेती उत्पादकावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, एकंदरीत जिल्ह्यामध्ये ऑगस्ट पासून सततचा पाऊस, कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे, परतीच्या पावसामुळे फुल शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे येणाऱ्या दिवाळी सणामध्ये फुलांचा सुगंध मागणार आहे असे चित्र दिसत आहेत.
0 Comments