
यंदा दिवाळीत दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण , खगोल प्रेमीमध्ये उत्साह
यंदा दिवाळीत मंगळवार दि,२५ ऑक्टोंबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. अश्विन अमावस्या मंगळवारी असून त्यादिवशी खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे, सूर्यमालेतील सर्वात चमत्कारिक असे खंडग्रास सूर्यग्रहण आहे त्यामुळे खगोल प्रेमी आणि अवकाश अभ्यासकामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.२७ वर्षांनी हा योग जुळून आला आहे त्यामुळे वर्षातल्या शेवटच्या या खंडग्रास सूर्यग्रहणाचा नजारा पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी तयारी सुरू केली आहे. खंडग्रास सूर्यग्रहणामुळे दिवाळीचा सणही एक दिवस अगोदर आल्याचे बोलले जात आहे. भारतात दुपारी २.२८ ते६.३२ या वेळेत सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये अंशता चंद्र झळकणार आहे. असा खंडग्रास सूर्यग्रहणाचा नजारा दिसणार आहे या खंडग्रास सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सहा तासाचा असून त्यात चार तास प्रभाव मराठवाड्यात दिसणार आहे त्यामुळे खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हा नजराणा पर्वणीचा ठरणार आहे.

0 Comments