नाईचाकुर/प्रतिनिधी: उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथील कृषी पंपाला महावितरण कडून ४८ तासाला फक्त ८ तास वीज सोडली जाते त्यामुळे नाई चाकूर येथील ग्रामस्थांनी उमरगा येथे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र शेंडेकर, उमरग्याचे प्रभारी तहसीलदार रतन काजळे, आमदार ज्ञानराज चौगुले यांना निवेदन देऊन आठ दिवसात नाईचाकूरला दररोज सुरळीत वीज पुरवठा सोडण्यासाठी निवेदन देण्यात आले . निवेदनात असे म्हटले आहे की नाईचाकूर येथील वीजपुरवठा 48 तासांपैकी फक्त आठ तास सोडला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास आठ दिवसानंतर महावितरणच्याकार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी ही निवेदनात म्हटले आहे .तसेच मागील वर्षी नाईचाकूर येथील शेतकऱ्यांनी थकीत वीज बिलापोटी ६५ लाख रुपये भरणा केला होता. येथील शेतकऱ्यांनी सर्वाधिक भरणा महावितरणकडे केलेला असताना मात्र याच गावाला दोन दिवसाला वीज पुरवठा होत असल्यामुळे येथील शेतकरी बांधवातून नाराजी व्यक्त होत आहे. उमरगा तालुक्यातील सर्वाधिकओलिताखाली क्षेत्र असलेले नाईचाकूर हे गाव आहे त्या गावाला एक दिवसा आड वीज पुरवठा महावितरण करत आहे. निसर्गाच्या संकटामुळे हाता तोंडासी आलेले सोयाबीन अतिवृष्टीने माती मोल झाले आहे शेतकरी मेटाकुटीला आला आहे कशीबशी उसनेवारी पैसे घेऊन शेतकरी रब्बीच्या मशागत पूर्ण करून पेरणीसाठी धावपळ करीत आहेत. त्यातच महावितरणने लगेच एक दिवसा आड वीज पुरवठा सोडल्यामुळे रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी परिस्थिती परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे संताप शेतकर्यांनी उमरगा तालुक्यातील महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र शेंडेकर, उप अभियंता गोपाळ जोशी यांना निवेदन दिले व परिसरातील शेतकऱ्यांना दररोज वीज सोडण्याची विनंती केली मुख्य अभियंता शेंडेकर यांनी शेतकऱ्यांना दररोज वीज सोडली जाईल असे आश्वासन दिले आश्वासनाची पूर्तता नाही झाल्यास नाईचाकूर येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उमरग्याचे तहसीलदार , तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनाही निवेदन देण्यासाठी गेले असता ते कामानिमीत्त बाहेर आहेत असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले .यावेळी शेतकऱ्यांनी दूरध्वनी वरुन आमदार साहेबांना बातचीत केल्यानंतर ज्ञानराज चौगुले यांनी नाईचाकूरचा विजेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे आश्वासन दिले. नाईचाकूर येथे ३३ केव्ही मंजूर झाले आहे पण तात्पुरता उपाययोजना म्हणून त्यावर तोडगा काही दिवसात काढला जाईल असे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी नाईचाकुर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत. तसेच निवेदनावर नाईचाकूर येथील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
0 Comments