उस्मानाबाद: समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रहार करून सर्वसामान्यांचा आवाज ठरलेले पत्रकार विनोद विठ्ठलराव बाकले यांना वारकरी साहित्य परिषदेचा विठ्ठल पुरस्कार जाहीर झाला आहे. गत 10 वर्षापासून श्री बाकले हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या अनेक बातम्यांची दखल राज्य पातळीवरही घेण्यात आलेली आहे.
वारकरी साहित्य परिषदेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव (सि.ता.उस्मानाबाद) येथे शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे शानदार सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत व भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पत्रकार विनोद बाकले यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेवून अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा विठ्ठल पुरस्कार जाहीर त्यांना करण्यात आला आहे. श्री बाकले यांनी कृषी, राजकीय, शैक्षणिक, उद्योगसह ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवला आहे. विशेषतः भ्रष्टाचाराचा त्यांनी या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार श्री बाकले यांचे सर्वञ अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments