तुळजापुर: तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून दि, २९ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील अकरा उमेदवारांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे तर सदस्य पदासाठी पंधरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी तालुक्यातील काटी ३ , निलेगाव १ , वाणेवाडी १ , काक्रंबा २ , गुळहळ्ळी १ ,सांगवी काटी १ , केमवाडी १ , काटगाव १ या गावातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी तालुक्यातील आपसिंगा १ , वानेवाडी ६, जळकोटवाडी १, काक्रंबा १ , सांगवी काटी ५ , कार्ला १ येथील उमेदवारांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.
0 Comments