Hot Posts

6/recent/ticker-posts

गावगाड्यात रब्बी हंगामात राजकीईय पेरणीला वेग, वीज वसुलीच्या संकटाने शेतकरी मात्र अडचणीत


तुळजापुर/राजगुरु साखरे: यावर्षी खरीप हंगामातील मुख्य पिकांचे सततचा पाऊस ,अतिवृष्टी, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातून कसाबसा बळीराजा सावरून रब्बी हंगामातील गहू, ज्वारी , हरभरा आदी पिकांची पेरणी करण्यात व्यस्त असतानाच महावितरणच्या वीज तोडणीच्या मोहिमेने शेतकरी धास्तावला आहे, त्याचबरोबर गाववाड्यातील महत्त्वाची समजणारी जाणारी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे गाव पुढार्‍यांना वेध लागले आहे त्यामुळे गुलाबी थंडीत गाववाड्यातील राजकारणही तापू लागले आहे. तसेच या पाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समितीसह , जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपंचायतीच्या निवडणुका ही येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे , त्यामुळे निवडणुकीची तयारी म्हणून इच्छुक नेते मंडळीनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या पेरण्या सुरू असताना पुढाऱ्यांच्या राजकीय पेरणीलाही वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच महावितरणचे नवे संकट उभे ठाकले आहे .पिकांना पाणी देण्यासाठी बळीराजा आटापिटा करीत आहे,  खरिपातले नुकसान भरून काढण्यासाठी पिके जगवण्याच्या प्रयत्नांना महावितरण कंपनीने मात्र खोडा घातला आहे. चालू बिल न भरल्यास कृषी पंपाची वीज जोडणी तोडण्याचा सपाटा कंपनीने लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे , विशेष म्हणजे डीपीवरील सर्व शेतकऱ्यांनी विज बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही अशी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकटाचा  सामना करावा लागत आहे. यंदा उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी सततचा पाऊस, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील  शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याची शासनाकडे बाजू मांडून न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments