![]() |
संग्रहित फोटो |
उस्मानाबाद : राज्यभर ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू असतानाच निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभर गोंधळ उडाला आहे यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी देण्यात आली आहे तसे प्रसिद्धी पत्र निवडणूक आयोगाने काढले आहे. . महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दि ९/ ११ /२०२२ च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या निवडणूक कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणाली द्वारे दिनांक २८/११/२०२२ ते दिनांक २/१२/२०२२ या कालावधीत संगणक प्रणाली द्वारे नामनिर्देशक पत्र भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी आयोग नामनिर्देशन पत्र पारंपारिक पद्धतीने ( ऑफलाइन ) स्वीकारण्याची परवानगी देत आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ दिनांक २/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवण्यात येत आहे. तरी त्या अनुषंगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यारी व संबंधिताना तातडीने पारंपारिक पद्धतीने नामनिदर्शनपत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना द्याव्यात तसेच नामनिर्देशन पत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल , याची व्यवस्था करावी तसेच याबाबतची व्यापक प्रसिद्धी स्थानिक पातळीवर देण्यात यावी.
तसेच वरील प्रमाणे पारंपारिक पद्धतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपञ संगणक चालकाच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RO Login भरून घेण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसीलदारावर राहील असे निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात घोषित केले आहे.
0 Comments