चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील बस सेवा मागील तीन वर्षापासून बंद होती अखेर दि, १२ पासून सुरळीत बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थीसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील बस सेवा मागील तीन ते चार वर्षापासून खंडित झाली होती, यामुळे विद्यार्थी सह नागरिकांचे मोठी गैरसोय होती याचे गांभीर्य लक्षात घेऊन तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व येथील युवक पिंटू उर्फ प्रशांत बिराजदार, सचिन बिराजदार , माजी सरपंच लक्ष्मण मेंढापुरे , दीपक पाटील , शंकर बिराजदार,लक्ष्मण लबडे, संदीप शिंदे ,माजी सैनिक विठ्ठल होगाडे, भीमा देडे यांच्या पुढाकारातून व प्रयत्नातून अखेर दि, १२ पासुन बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने बस चालक व वाहकज् यांना पुष्पगुच्छ नारळ देऊन बसला पुष्पहार अर्पण करून आनंदोउत्सव साजरा करण्यात आला.यावेळी माजी मुख्याध्यापक रावसाहेब पाटील, प्रभाकर बिराजदार ,नरसिंग झिंगरे , लक्ष्मण लबडे , माजी सैनिक विठ्ठल होगाडे संदीप शिंदे , नागनाथ काळजाते , राजेंद्र देशमुख , शिवराज भुजबळ ,सचिन हिंगमिरे, अरुण पाटील, हरिदास बिराजदार, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होत.
0 Comments