Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत रणसंग्राम: भाऊ चिंता नसावी हवा तुमचीच, अहो आम्ही तर तुमचेच ना ! , चाणक्ष मतदाराकडून उमेदवारांचा उत्साह वाढवण्याचा फंडा

 


उस्मानाबाद:   जिल्ह्यात सध्या १६६ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून प्रचारही सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारांची मत परिवर्तन करताना उमेदवारांना चांगलीच दमछाक होत आहेत. मतदारांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवार मतदारांना विविध आश्वासनाची खैरात देत आहेत तरीही चाणक्य मतदार प्रत्येक उमेदवाराला झुलवत ठेवून  " भाऊ चिंता नसावी हवा तुमचीच, अहो आम्ही तर तुमचेच ना ! असा प्रत्येकाला दिलासा देत नकार न देण्याचा फंडा आजमावत असल्याचे चित्र दिसत आहेत. अर्ज दाखल केल्यापासून प्रभागातील नागरिक कार्यकर्त्यांना सांभाळून त्यांची मर्जी राखणे हे काम उमेदवाराला मोठे जिकरीने करत आहेत. मताचे दान आपल्या पारड्यात पडावे म्हणून हे सारे सहन करून मतदारांना खुश करण्यासाठी  वाटेल ते केले जात आहे. मतदाराजामध्ये सध्या सोशल मीडियाच्या , वर्तमानपत्रे यामुळे जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आश्वासनाला ,भुलतापाच्या आमिषापासुन मतदार राजा दूर  असल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यात सध्या  गावोगावी राजकीय चर्चांना उधाण आले आहे .काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी चौरंगी पंचरंगी सामना पाहायला मिळत आहेत, पॅनल जास्त असलेल्या ठिकाणी कोण उमेदवार कोणत्या पॅनल मध्ये उभा आहे याची खात्री मतदारांना करून घ्यावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. आम्ही कसा गावचा थांबलेला विकास करू शकतो हे पटवून सांगण्याचा उमेदवारांचा गावोगावी प्रयत्न चालू आहे. 
काही गावात जुन्यासह नवीन चेहरेही रिंगणात उतरले आहेत, तर अनेक गावात तरुणांचा उत्साह असल्याचे दिसून येत आहे. सध्या बहुतांश गावात वीज ,पाणी, रस्ता असे प्रश्न ऐरणीवर आले आहेत तर दुसरीकडे शेतात रब्बी हंगामातील पिकांची विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी कार्यकर्ते गल्लीबोळातून घरोघरी फिरून निवडणुकीनंतर आम्ही काय करणार आहोत, याचा पाढा वाचत आहेत, मतदार पण चाणाक्षपणे मतदान तुम्हालाच असे सांगून उमेदवारांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments