चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष मधुकर शेळके, उपाध्यक्ष ज्योतीराम माळी यांनी तहसीलदार साहेब तुळजापूर यांच्यामार्फत मा. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी देवी दर्शनासाठी येतात मात्र महालक्ष्मी मंदिर देवस्थान पासून ते नळदुर्ग रोडवरील चिवरी पाटी कमान पर्यंत रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
0 Comments