Hot Posts

6/recent/ticker-posts

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाईचाकूरच्या चेअरमन पदी काँग्रेसचे पक्षाचे सतीश पवार तर व्हाईस चेअरमनपदी रमेश पांचाळ यांची बिनविरोध निवड


नाईचाकूर प्रतिनिधी/  गुणवंत पवार :उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी काँग्रेसचे सतीश केशवराव पवार तर काँग्रेसचे रमेश पांचाळ व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली विविध कार्यकारी सेवा सोसायटी मागील तीस ते पस्तीस वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात होती पण सर्वप्रथम काँग्रेसच्या ताब्यात गेली असुन विविध कार्यकारी सोसायटीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे . शिवसेनेच्या पूर्वी शेकाप जनता दल यांच्या ताब्यात विविध कार्यकारी सोसायटी होती त्यानंतर शिवसेनेची एक हाती  सत्ता होती. दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी माळी एस. जी. नेतृत्वात विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडाऊनमध्ये नूतन संचालकाची बैठक बोलवली होती यावेळी काँग्रेस पक्षाचे सतीश पवार त्यांचा चेअरमन पदासाठीव रमेश पांचाळ यांचा व्हाईसचेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संचालक जाधव अरविंद, अर्जुन पवार, व्यंकट पवार, बिभिशन पवार ,सतीश पवार, हरी माने, रमेश पवार , विकास पवार ,दूधभाते प्रेमनाथ, गव्हाळे कालिदास ,रमेश पांचाळ ,केशरबाई पवार ,रुपाली पवार आदी  संचालक उपस्थित होत.




Post a Comment

0 Comments