Hot Posts

6/recent/ticker-posts

उस्मानाबाद : जिल्ह्यात वेळ अमावस्या सण उत्साहात साजरा

तुळजापूर तालुक्यातील  येवती येथील वेळ अमावस्या 

उस्मानाबाद:जिल्ह्यासह सीमावर्ती भागात  दि,२३ (शुक्रवारी )रोजी बळीराजाचा महत्वाचा  वेळ अमावस्या('येळवस')हा सण  उत्साहात साजरा करण्यात आला. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला बळीराजाचा सण म्हणजे 'येळवस' अर्थात वेळ आमावस्या. यावर्षी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या तडाख्याने व ऑक्टोंबर अखेरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर झाल्याने शेतशिवारात कमी अधिक प्रमाणात बहरली  आहेत. यंदा जिल्ह्यात सुरुवातीपासूनच खरीप हंगामातील पिकांना सततचा पाऊस, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भाव, त्यानंतर अतिवृष्टीने हातात तोंडाशी आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात झाले होते. मात्र बळीराजांनी मोठे हिमतीने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली . बळीराजा आसमानी सुलतानी  संकटाला सामोरे जात आज शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा वेळ अमावस्या हा सण मोठ्या उत्साहाने काळ्या आईचे कौतुक करून (शुक्रवारी )बळीराजांनी साजरे केले . कारभारणीसमवेत खोपीतल्या पांडवाचे भक्तिभावाने पूजन करून कुशल मंगलाची अन् धनधान्य संपन्नतेची कामना तिच्याकडे केली. हर हर महादेव चा जयघोषाने घोषाने शेतशिवारे गजबजलेले होती.वेळ अमावास्या हा जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीचा मानाचा सण असुन  पंधरा दिवसांपासून या सणाचे वेध बळीराजाच्या कुटुंबाला लागतात. यावर्षी सुद्धा बळीराजा मोठ्या उत्साहात सण साजरा करत असल्याचे दिसून आले. बाहेरगावी असलेली मंडळी एक दिवस अगोदरच या सणासाठी आपापल्या घरी येतात. शुक्रवारी सकाळी कुणी पायी, कुणी बैलगाडीने, तर कुणी मिळेल त्या वाहनांनी शेताचा रस्ता धरला होता. शहर परिसरात सर्वत्र सामसूम दिसून आले. जणू अघोषित संचारबंदी लागल्याचा भास होत होता. ग्रामीण भागातील गावे सुद्धा निर्मनुष्य झाली होती, तर शेत शिवारे अबाल वृद्धासह गजबजुन गेली होती. बहरलेल्या हरभऱ्यांची डहाळे शेंगानी लगडलेल्या तुरीच्या शेंगा, हिरव्यागार गव्हाची , पिवळ्या-केशरी रंगातील करडईच्या फुलांची पार्श्वभूमी या वेळ अमावसला लाभली नाही.

दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्या उशीरा झाल्याने पिकांचा बहार आणखी वाढला नाही. शेेतक-यांनी उत्पन्नाची आशा बाळगत पारंपारिक पद्धतीने काळ्याआईची सहकुटुंब पुजा केली. दुपारी एकनंतर शेतक-यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला.


लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथील  वेळ अमावस्या



Post a Comment

0 Comments