उस्मानाबाद: लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात लिंगायत समन्वय समिती अध्यक्ष ऍड. अविनाश भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली व सकल लिंगायत समाजाच्यावतीने २९ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मराठवाड्यातील लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. आप्पाराव हिंगमिरे यांनी केले आहे.भारतीय लोकशाहीचे जनक, समतानायक लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्व रानी १२ शतकात समाजात समानता निर्माण व्हावी, मानवाला मानव म्हणून जगता यावे, समाजात स्त्रियांचा सन्मान व्हावा तसेच समाजातील सर्व समस्या अनुभवमंडपाच्या माध्यमातून सोडवून समाजात एकोपा निर्माण करण्याचे महान कार्य महात्मा बसवेश्वरानी केले. तेव्हां पासून आजपर्यंत आपल्या देशासह परदेशात कोट्यवधी अनुयायी त्यांच्या विचारांचे व त्यांनी घालून दिलेल्या संस्कृतीचे अनुकरण करणारा लिंगायत समाज आज ही आपले अस्तित्व टिकवून आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळे पर्यंत लिंगायत धर्माचे सवतंत्र अस्तित्व होते मात्र सवातंत्र्या नंतर मात्र लिंगायत धर्मावर अन्याय झाला, याच्या सरकार दरबारी नोदी आहेत तरी ही स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाली तरी लिंगायत समाजाला न्याय मिळालेला नाही.
महाराष्ट्राचा विचार केल्यास जवळपास एक कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे. हा समाज सहिष्ण , समतावादी, विनयशील, नंब्र असल्यालेला समाज कधी ही आपल्या मुळे समाजातील इतर घटकाला त्रास होईल असे वर्तन दिसून आले नाही, हा समाज अल्पसंख्याक आहे, समाजात गरिबी मोठ्याप्रमाावर आहे, शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, तसेच सरकारच्या माध्यमातून काही विशेष प्रयत्न या समाजाच्या विकासासाठी केले जात नाहीत म्हणून लिंगायत समाजाच्या न्याय मागण्यासाठी येणाऱ्या २९ जानेवारी रोजी, आझाद मैदान ते मंत्रालय अश्या भव्य महामोर्चाचे आयोजन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती अध्यक्ष श्री अविनाश भोसिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे . या मोर्चाच्या माध्यमातून लिंगायत समाजाच्या महत्वाच्या समस्या सरकारच्या समोर मांडल्या जाणार आहेत त्यामध्ये
१) लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या
२) राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा जाहीर करा
३) लिंगायत युवकांच्या विकासा साठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा
४) मंगळवेढा येथे मंजूर असलेले महात्मा बसवेश्वरांचे स्मारक लवकर पूर्ण करावे
५) विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा
६) लिंगायत समाजातील सर्वच पोटजाती आरक्षणात आहेत त्यामुळे हस्तांतरित प्रमाणपत्रावर चुकून लिंगायत लागले असेल तर शुधीपत्रक काढून लिंगायत वाणी करण्यात यावे.
अशा न्याय मागण्या घेऊन आपण सर्व समाजातील बंधू भगिनी आपल्या भविष्यकालीन पिड्याच भवितव्यासाठी सर्वांनी एक दिवस समाजासाठी द्यावा आपल्या हक्काच्या मागण्या सरकारच्या माध्यमातून मंजूर करून घेऊयात असे आव्हान प्राचार्य डॉ. आप्पाराव हिंगमिरे यांनी केले आहे.
0 Comments