Hot Posts

6/recent/ticker-posts

दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन घरातच, दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान


तुळजापुर /राजगुरु साखरे:  उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अलीकडे सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात आहे, मात्र सोयाबीनची मळणी केल्यापासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत . दरम्यान या दरात आणखीन वाढ होईल या अपेक्षेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवणूक करून ठेवली आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाखो हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला होता, परंतु जून महिन्यापासून ते आक्टोंबर पर्यंत सततचा पाऊस , अतिवृष्टी, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पन्नात मोठी घट आली आहे. मागील वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाही मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड केली होती परंतु शेतकऱ्याचे नवीन सोयाबीन बाजारात दाखल होताच दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल सोयाबीन घरातच साठवणूक केली आहे. तर काही शेतकरी पैशाची गरज असल्यामुळे मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करत आहेत. सुरुवातीला सोयाबीनला ६००० हजार प्रति क्विंटल भाव मिळत होते त्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरणत होत गेली .सध्या सोयाबीनला ५२०० ते ५३०० भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला भाव परवडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून सोयाबीनला प्रति क्विंटल ६००० हजार ते ७००० हजार प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे. 


Post a Comment

0 Comments