Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालूक्यातील काळेगाव येथे बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले शैक्षणीक साहित्याचे वाटप


काळेगाव: तुळजापूर तालुक्यातील  काळेगाव येथील बुद्धवाशी हौसाबाई नामदेव साखरे यांचे १६ मार्च २०१६  रोजी निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू पत्रकार प्रकाश अप्पासाहेब साखरे यांच्या तर्फे २०१७ पासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी पहिली ते सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करण्यात येते .मध्यंतरी कोरोना मुळे शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे दोन वर्ष वही पेन चे वाटप करण्यात आले नाही नंतर पारिस्तिथी आटोक्यात आल्यानंतर शाळा महाविद्यालय चालू झाले आहेत त्यामुळे पुन्हा वही पेन वाटप करण्यास सुरुवात करण्यात आले आहे या वर्षी वही पेन वाटपच्या वेळी काळेगाव तंटामुक्त अध्यक्ष सुग्रीव कचरे, काळेगावचे पहिले शिक्षक, मुख्याध्यापक पोपट उंबरे, प्रभाकर जाधव, शंकर भोरे अप्पासाहेब साखरे शाळेचे मुख्याध्यापक पोतदार ए. पी, सहशिक्षक गायकवाड पी.पी, मशाले ए.बी. भोसले यु .आर.  आदी ग्रामस्थ उपास्थित होते.

Post a Comment

0 Comments