Hot Posts

6/recent/ticker-posts

टेम्पोच्या धडकेत आरळी खुर्द येथील वृद्ध ठार., महिला जखमी


तुळजापुर: भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ६० वर्षीय वृद्ध ठार तर त्यांची पत्नी जबर जखमी झाली .ही दुर्घटना १२ फेब्रुवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास तुळजापूर बस स्थानकासमोरील तुळजापूर -लातूर रोडवर घडली. याप्रकरणी संबंधित वाहनधारकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील आरळी (खुर्द) येथील विजय महादेव लोहार वय (६०) हे रविवारी दुपारी पावणे एक वर्षाच्या सुमारास तुळजापूर बस स्थानकासमोरील तुळजापूर लातूर रोडवर दुचाकीने जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात टेम्पो चालकाने जोराची धडक दिली, या अपघातात विजय लोहार हे गंभीर जखमी होऊन मयत झाले तर त्यांची पत्नी अलका लोहार या गंभीर जखमी झाल्या. अपघाती घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून प्रसार झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा सचिन विजय लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments