चिवरी: महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रोत्सवास मंगळवार उद्यापासून प्रारंभ होत आहे. महालक्ष्मीची यात्रा प्रथेप्रमाणे दरवर्षीच्या माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरी केली जाते. पोलीस प्रशासन, देवस्थानकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मागील दोन-तीन दिवसापासूनच नारळाचे दुकाने , पेढे विक्रेते, हॉटेल , लहान मुलांची खेळणी दुकाने, आदी व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत, यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला आहे. यात्रेचा मंगळवार हा मुख्य दिवस असुन ,बुधवारी दि,८रोजी सकाळी सात वाजता पान व लिंबु याचा घाव होतो व दुपारी चार वाजता कुस्त्याचा जंगी फड घेऊन यात्रेची सांगता होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा भरली नव्हती यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे निर्बंध मुक्त यात्रा होत असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचबरोबर यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलीस ठाणे यांच्याकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
0 Comments