Hot Posts

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे डायलेसीस विभाग सुरु करा -आपची मागणी


तुळजापुर : उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे त्वरीत डायलेसीस विभाग सुरू करा अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष मधुकर शेळके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक अधिक्षक उस्मानाबाद यांच्याकडे मार्फत मा. वैद्यकीय अधिक्षकउपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे  आदमी पार्टी तुळजापुर वतीने  दि,९ रोजी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले या वेळी तुळजापुर उपजिल्हा रुग्णालय संचालक आनंद कंदले आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की,  तुळजापुर येथे मंजुर असलेले डायलेसीस विभाग त्वरीत सुरु करण्यात यावे त्यामुळे तुळजापुर तालुका व सलग्न नळदुर्ग इतर अनेक गावातील डायलेसीस करित असलेल्या रुणांचा उस्मानाबाद सोलापुर येथे रुटीन  डायलेसीस करण्याकरिता येण्या जाण्याचा त्रास वाचेल व नाहक  आर्थिक भुर्दड होणार नाही रुग्णांना गरजु गरिब रुग्णांना त्याचा फायदा होईल .
मार्च २०२२ मध्ये डायलेसीस तंत्रज्ञ पदाकरिता NRHM उस्मानाबाद मुलाखातीमध्ये झाल्या होत्या व तुळजापुर विभागाकरिता डायलेसीस तंत्रज्ञ पद भरती केली होती तरीपण अद्याप डायलेसीस विभाग सुरु झाला नाही .तरी त्वरीत तुळजापुर उपजिल्हा रुणालय येथे डायलेसिस विभाग सुरु करण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टी तुळजापुर वतीने जनतेच्या रुणांच्या हिताकरिता तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.                       

Post a Comment

0 Comments