Hot Posts

6/recent/ticker-posts

बीडच्या नवीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांची नियुक्ती, राधाबिनोद शर्मा यांची बदली


बीड- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी औरंगाबाद सिडको येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तर त्या बीड जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा नाव लौकीक राहणार आहे. यापूर्वी प्रेरणा देशभ्रतार यांचे नियुक्ती झाली होती मात्र त्या रुजू झाल्या नव्हत्या.मुधोळ यांनी बुधवारी पदभार स्वीकारला  आहे. मुधोळ या २०११ च्या आयएएस अधिकारी आहेत, त्या या अगोदर  सांगली व उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे .बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीची चर्चा मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून होती. शेवटी त्यांची बदली मंगळवारी झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  


Post a Comment

0 Comments