बीड:पाच एकर शेतीपैकी ३ एकर शेतात कांदा पीक असून त्यासाठी लाखावर खर्च केलेला आहे परंतु बाजारात कांद्याला एक रुपयाचा भाव मिळत असून डोक्यावरील कर्ज कसे काढायचे या विवंचनेतून तरुण शेतकऱ्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना बीड जिल्ह्यातील बोरखेडे येथे बुधवारी दि,८ रोजी सकाळी उघडकीस आली. सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने, शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसे फेडावे या काळजीने २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, संभाजी अर्जुन अष्टेकर (वय २५ वर्ष ) असं तरूण शेतकऱ्याच नावं आहे. पाच एकर जमीन असून, त्यानी आपल्या तीन एकर शेतात कांद्याचे पीक घेतले होते. कांद्याला पाणी द्यायचं म्हणून दि,७ रोजी रात्री शेतात गेला आणि परत वापस आलाच नाही. सकाळी शेतात जाऊन बघितले असता आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आपल्या शेतात पिकविलेल्या कांदा पिकाला यंदा बाजारात भाव नसल्याकारणाने, आता आपण घेतलले ३ लाख कर्ज कसे फेडणार या काळजीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. कांद्याला भाव नसल्याने राज्यातील शेतकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यातही अनेक कांदा उत्पादक शेतकरी आहेत. बोरखेड येथील संभाजी अर्जुन आष्टीकर (वय २५ वर्ष) या शेतकर्याने कांदा लावला होता. कांद्याला भाव मिळत नसल्याने सदरील शेतकर्याने रात्री आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments