Hot Posts

6/recent/ticker-posts

येवती येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न


तुळजापुर:  तुळजापूर तालुक्यातील येवती येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा दि,११ रोजी  खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, कळंब -धाराशिव  मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांडपाणी घनकचरा, बिरुदेव सभामंडप, जन सुविधा सिमेंट रस्ता, पाणीपुरवठा कुपनलिका मारणे ,२५/१५ सिमेंट  रस्ता , तांडा वस्ती सिमेंट रस्ता, दलित वस्ती सुधार योजना, जल जीवन मिशन २०२१-२२ नळ पाणीपुरवठा योजना आदी विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी  राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख जगन्नाथ दाजी गवळी, महिला आघाडी तालुकाप्रमुख शामलताई वडणे, सरपंच पूजा अमोल गवळी उपसरपंच प्रीतम गायकवाड ,माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार,कमलाकर चव्हाण, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक रोचकरी, माजी सैनिक राजेंद्र जाधव ,अल्पसंख्याक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख ,शेखर जमादार निलेगाव सरपंच,डॉ. बालाजी जाधव शिरगापूर सरपंच,सोमनाथ गुड्डे दहिटणा उपसरपंच , तालुका युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष समाधान ढोले ,अल्पसंख्याक विभाग प्रमुख समाधान कुंभार, सोशल मीडिया विभाग प्रमुख विकास सुरवसे ,सुनील जाधव आदीसंह ग्रामस्थ उपस्थित होत.


Post a Comment

0 Comments