तुळजापूर: तालुका परिसरात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे काढणीसाठी शेतकरी धावपळ करीत आहेत, येत्या 15 मार्च ते 20 मार्च च्या दरम्यान हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवीला आहे त्यामुळे बळीराजा हातात तोंडाशी आलेली पीक वाया जाऊ नये म्हणून पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करीत आहेत, सध्या सर्वत्र गव्हाच्या राशी अंतिम टप्प्यात आले आहेत, मात्र ज्वारी ज्वारी पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता शेतकरी बांधवातून बोलले जात आहे. एकंदरीत शेतकऱ्याला वर्षभरातील दोन्ही हंगामातील पिकांना आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.
0 Comments