चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे हातात तोंडाशी आलेल्या रब्बी पिकासह द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. गुरुवार (दि,१६)शुक्रवार (दि,१७) रोजी मध्यरात्री झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या ज्वारी गहू ,हरभरा आदी रब्बी पिकांसह द्राक्षे ,आंबा या फळबागांचे नुकसान झाले आहे. अगोदरच द्राक्षांचे पडलेले दर यामुळे व्यापारी कवडीमोल दराने मागणी करत असल्यामुळे परिसरातील द्राक्षबागायतदारांनी बेदाणा प्रक्रियेसाठी कल वाढवला आहे, त्यातच मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत, एकंदरीत शेतकऱ्यांमागील संकटाचे शुक्लकास्ट काही केल्या संपत नाही, कधी अतिवृष्टी कधी ओला दुष्काळ तर कधी अवकाळी हे चित्र सर्रास परिसरात दिसू लागले आहे , यामुळे परिसरातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. यामुळे शासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
माझ्या एक एकर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड केली आहे, मागील दोन दिवसापासून पडत असलेली अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या द्राक्ष बागेला फटका बसला आहे, या पावसामुळे द्राक्षाचे घड गळुन पडत आहेत, त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही
0 Comments